अमळनेर (प्रतिनिधी) बेळगाव येथे अमळनेरचे सुपुत्र किरण सरदार साळुंके यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
किरण साळुंके हे अमळनेर येथील सानेनगर येथील मूळ रहिवासी आहेत. ते कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिस्तबद्ध व क्रियाशील मुख्याध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत. इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी आणि नेशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगावी या संस्थेतर्फे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यासाठी अनेक वरिष्ट अधिकारी व अनेक व्यक्तींनी यांच्या नावाची शिफारस केली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, गोवा व गुजरात या राज्यातून निवडक व्यक्तीमध्ये त्यांची ही निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्काराबद्दल अमळनेर येथील समस्त मित्र परिवाराने त्यांचे कौतुक केले आहे.