
◆ अबकी बार नही आयेगी ये मोदी सरकार- अरुण भाई गुजराथी



(प्रतिनिधी) अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशरवर आयोजित मेळाव्यातव्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार डॉ सतीश पाटील गुलाबराव देवकर,जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, गफ्फार मलिक,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा निरीक्षक करण खराटे, तिलोत्तमा पाटील, ओबीसी सेल सरचिटणीस सविता बोरसे, कल्पना अहिरे, अभिषेक पाटील, ललित बागुल,उमेश पाटील अनिल भाईदास पाटील,कल्पिता पाटील, रंजना देशमुख,अशोक पाटील, मजहर पठाण, मनोराज पाटील, खलील देशमुख प्रतिभा शिरसाठ, मंगलाताई पाटील, नितिन तावडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी भागवत पाटील डॉ रामू पाटील,रामकृष्ण पाटील जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील आदींनी मनोगत केले.प्रास्ताविक अनिल भाईदास पाटील यांनी केले मेळाव्यास उशिरा चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत साळुंखे, शहराध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव,भगवान पाटील. आदींनी हजेरी लावली.
यावेळी मनोगतात सर्व नेत्यांनी ठरविले तर गिरीश महाजन यांना जामनेर मध्ये हरविल्याची हवा चाखविल्या शिवाय राहणार नाही असे मत जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. तर दिलीप वाघ यांनीही आपण अनिल पाटील यांच्या सोबत राहणार असल्याचे यावेळी सांगितले. अनिल पाटील यांच्याकडे संघटन गुण कौशल्य आहे. हे समोर जमलेल्या बूथ कमिटयांच्या मेळाव्यातून दिसून येते. अनिल पाटील लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीत असल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला. व बुथप्रमुखांना जास्त सक्रिय होण्याचे आवाहन केले. तर गुलाबराव देवकर यांनी यावेळी बोलताना पक्षाच्या प्रचाराची मुहुर्तमेढ रोवली असून अनिल दादा वातावरण चांगले आहे. गाव सांभाळा सर्व घटक अडचणीत आले आहेत. त्याचा पद्धतशीर फायदा घेत तळागाळापर्यन्त भाजपचा नाकर्तेपणा घराघरात पोहचवा असे संगितले जळगाव जिल्हा पक्ष निरीक्षक करन खलाटे यांनी यावेळी कार्यकर्त्यांनी शोषल मीडिया अधिक प्रभावी वापर केला पाहिजे. यावेळी गफिल न राहता बारामतीचा निरोप घेऊन आलो आहे. तेव्हा आपला खासदार निवडून आणा असे आवाहन यावेळी केले. गफ्फार मलिक यांनीही शिवाजी महाराजांची इच्छा होती की दिल्लीच्या तख्तावर सत्ता यावी यासाठी आता अबकी बार बदलेगी सरकार सांगत आम्हाला बाहेर काढणाऱ्यांना आम्ही मत देणार नाही असे सांगितले.
माजी मंत्री सतिश पाटील…..…
गिरीश महाजन सध्या हवेत आहेत. बारामती जिंकण्याची भाषा करतात. गुलाबराव पाटील यांनी आम्ही लंगोट बांधून कुस्ती खेळतो असे वक्तव्य केले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी मी गादीवरची कुस्ती खेळतो असे म्हटले होते. जिल्ह्यातील मंत्र्यांनी लाज लज्जा विकली गादीवरची कुस्ती कोणती ही सर्वांना माहिती आहे. मी सांगायला नको असा टोला लगावत माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आम्ही रस्त्यावरचे पैलवान आहोत असे सांगितले. अनिल पाटील यांनी विश्वास टाकावा शब्द देतो तडा जाणार नाही. आमच्या पारोळ्यात गेल्या काही दिवसांपासून तिकीट कापले जाऊ नये म्हणून ठाण मांडून बसले आहेत. एकनाथराव खडसे म्हणतात दोन्ही जागा निवडून येतील तर गिरीश महाजन म्हणतात आमचे उमेदवार अद्याप निश्चित नाहीत. या जिल्ह्याचे दुर्भाग्य आहे की पालकमंत्री झेंडा फडकवत नाही. डीपीडीसी च्या माटिंग होत नाही.
चार दिवसांपूर्वी अमळनेरचे पाडळसरे धरण संघर्ष समितीचे शिष्टमंडळ आले होते. त्यावेळी भाजपचे सुभाष चौधरी यांना म्हणालो की तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष मंत्री निधी देत नसेल तर त्या पक्षात का थांबता. मोदींना निवडून दिलं सर्वांनी मोठी चूक केली आहे. पवारांच्या डोक्यात अनिल पाटील निश्चित आहेत. पवारांनी न्याय देण्याचे काम केले आहे. अनिल दादा अस्तित्वाची ही लढाई आहे. २०१९ च्या निवडणुकीत किंगमेकर शरद पवार राहणार आहे. खासदार निवडून द्या पाडळसरे धरण मार्गी लावतो हे लक्षात असू द्या. असे आमदार डॉ सतीश पाटील यांनी यावेळी सांगितले
बारामती हे राष्ट्रवादीचे तीर्थक्षेत्र – अरुणभाई गुजराथी
बारामती हे राष्ट्रवादीचे तीर्थक्षेत्र आहे असे सांगत अरुणभाई गुजराथी यांनी कार्यकर्त्यांना सांगत बोलण्यास सुरुवात केली. अनिल पाटील यांची लोकप्रियता चांगली आहे. ती प्रेरणा घेऊन आम्ही जिल्ह्यात जाणार आहोत. अबकी बार नही आयेगी ये मोदी सरकार असे सांगत लोकांना प्रश्न विचारा रोजगार किती मिळाला, शेतीमालला भाव किती मिळाला, किती कर्ज माफ झाले. किती अनुदान मिळाले पिकविमा मिळाला का किती घटक सुखी झालेत. याबाबत चर्चा करा. अनिल पटल यांचे काम हेवा वाटेल असे आहे. अमळनेर मतदार संघ आता प्रतिष्ठेचा झाला आहे. भाजपच्या शब्दांवर आता भरोसा करू नका. विकास केला नही म्हणून गाईच्या नावाने आणि रामाच्या नावाने जप करणे सुरू झाले आहे. तुमचा राम आहे आमचा नही का असा सवाल त्यांनी यावेळी केला. अनिल पाटील विजयी झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करा असे वाहन त्यांनी बूथ कमिटी मेळव्यात केले.






