अमळनेर (प्रतिनिधी) मेरा परिवार,भाजपा परिवार अंतर्गत आज आ.सौ.स्मिताताई वाघ यांच्या अमळनेर येथील निवासस्थानी भाजपाचा ध्वज लावुन ‘फिर एक बार- मोदी सरकार’ हा संकल्प घेण्यात आला.
तसेच अमळनेर शहर व ग्रामिण भागातील भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या निवासस्थानी देखील भाजपाचेध्वज लावण्यात आले. या प्रसंगी आ.सौ.स्मिताताई वाघ,भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ,पं. स.सभापती वजा आत्या भिल, तालुका सरचिटणीस हीरालाल पाटील, शहराध्यक्ष शितल देशमुख,सरचिटणीस उमेश वाल्हे, राजेश वाघ, युवा मोर्चा शहराध्यक्ष योगीराज चव्हाण,विस्तारक दीपक पवार,श्रीनाथ पाटील,समाधान पाटील,गौरव माळी,राहुल चौधरी,भुषण जैन,रवी ठाकुर व समवेत इतर मान्यवर उपस्थित होते.पक्ष संघटनेच्या आदेशान्वये हा उपक्रम राबविण्यात आला,विशेष म्हणजे या उपक्रमात कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य जनतेने देखील आपल्या घरावर भाजपाचे ध्वज लावून आम्ही देखील भाजपाचेच पारिवारिक सदस्य असल्याचा संदेश दिला,या उपक्रमामुळे शहर व तालुक्यात भाजपामय वातावरण निर्माण झाले आहे.याआधी आ सौ स्मिता वाघ व उदय वाघ यांच्या अथक मेहनातीतून संघटनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून भाजपाने आज प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केल्याचे दिसत आहे.त्याचा प्रत्यय आगामी निवडणुकीत दिसणार आहे.