जिल्हाभरातील प्रमुख नेत्यांची राहणार उपस्थिती,अनिल भाईदास पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन
अमळनेर-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते,बूथप्रमुख व हितचिंतकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन आज मंगळवार दि 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या दमोता माता स्टोन क्रशर,देवळी फाट्याजवळ,चोपडा रोड,अमळनेर येथे करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यात विधानसभेचे माजी सभापती अरुंणभाई गुजराथी, माजी मंत्री तथा पारोळाचे आमदार डॉ सतिष पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, चाळीसगाव चे माजी आ राजीव देशमुख,माजी खा वसंतराव मोरे, पाचोऱ्याचे माजी आ दिलीप वाघ,राष्ट्रवादीचे नेते गफ्फार मलिक, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील,सौ तिलोत्तमा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल,महिला जिल्हाध्यक्षा यासह अन्य जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.या मेळाव्याची जय्यत तयारी कार्यकर्त्यानी केली असून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह हितचिंतकाना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल भाईदास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून पक्षश्रेष्ठीनी देखील त्यांच्या नावास जलवळपास हिरवा कंदील दर्शविला आहे,तसेच जिल्ह्यातील नेते देखील त्यांच्या नावाला अनुकूल असल्याने त्यांचेच नाव निश्चित होईल असे मानले जात आहे.यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण होताना दिसत आहे. तत्पूर्वी पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतकांशी हितगुज व्हावे यासाठी हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याकडे संपूर्ण अमळनेर विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
तरी सदर मेळाव्यास राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,बूथप्रमुख व हितचिंतकांनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे विनम्र आवाहन अनिल भाईदास पाटील यांचेसह राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील,तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, ग्रंथालय सेलच्या प्रदेश सरचिटणीस सौ रिता बाविस्कर,महिला तालुकाध्यक्ष सौ योजना पाटील,शहराध्यक्ष सौ आशा चावरीया,युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, तालुकाध्यक्ष हर्षल पाटील,शहराध्यक्ष बाळू पाटील,विद्यार्थी शहराध्यक्ष सुनिल शिंपी आदींनी केले आहे.दरम्यान अनिल भाईदास पाटील यांच्यावर वैयक्तीक प्रेम करणारे मान्यवर तसेच स्नेही मंडळींना देखील या मेळाव्यात प्रत्यक्ष तसेच हस्ते परहस्ते निमंत्रित करण्यात आले असल्याने त्यांनी देखील अनिल पाटील यांना प्रोत्साहन देण्यासाठी पक्षभेद बाजूला सारून आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन देखील पदाधिकार्यांनी केले आहे.