
कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्याक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी केली .
भाषणे :
आयोजन समितीचे अध्यक्ष्य राजेंद्र कोतकर — शारिरिक शिक्षणाच्या बाबतीत राज्य शासन क्रीडा शिक्षकास व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.शासनाने संच मान्यतेतून क्रीडा शिकक्षकास हद्द पार करण्याचा मार्ग अवलंबत आहे मात्र सुदृढ भारत क्रीडा शिक्षकच बनवू शकतो
आप्पासाहेब शिंदे- – मी क्रीडा शिक्षक असल्याचा मला अभिमान आहे.मुख्याध्यापका नंतरचे काम शाळेत क्रीडा शिक्षक करत आसतो . शासनाणे क्रीडा शिक्ष्याकांना शाळा बाह्य काम देता कामा नये . आजकाल लहान मुल आईला म्हणत “आई मला खेळायला जाऊ दे न वा ” ,आई म्हणते जा खेळायला मात्र शासन क्रीडा शिक्षकाला खेळू द्यायला तयार नाही . क्रीडा शिक्षक जर टिकला नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन शेतकऱ्यां सारखे आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.
आमदार सुधीर तांबे- -आजकाल समाजामध्ये विद्वेष्याचे वातावरण होत आहे .केवळ खेळामुळेच विद्वेष्य नाहीसा होऊ शकतो.एका विक्षिप्त सचिवाने क्रीडा शिक्षकाला संच मान्यतेतून वगळले .क्रीडा शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. क्रीडा शिक्षक हा पूर्ण वेळ असलाच पाहिजे एकीकडे खेलो इंडिया आणि सि एम चषक भरवायचे आणि दुसरीकडे राज्य शासन शारिरिक शिक्षणाच्या बाबतीत नकारात्मक भूमिका घेत आहे.
शिक्षक आमदार किशोर दराडे– शिक्षकाना अनेक समस्या भेडसावत आहे या समस्या सोडवायच्या असतील तर त्यांनी संघटीत होण गरजेच आहे आपण कोणत्या पक्ष्याचे आहोत हे न बघता आपण शिक्षक आमदार आहोत आणि शिक्षकांचे प्रश्न आपण मार्गी लावले पाहिजे. याची मला जाणीव आहे शाळेत क्रीडा शिक्षकच नसेल तर विध्यार्थ्यांचे भवितव्य घडणार नाही .शारिरिक शिक्षकांच्या या समस्यांसाठी शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्री याच्या सोबत बैठक घडवून आणू असे त्यांनी आश्वासन दिले.
भारतीय ओलिंपिक असोशीएशन चे सहसचिव नामदेव शिरगावकर– क्रीडा शिक्षक हा प्रॅकटीकल असतो. सध्याच्या युगात त्याने स्वतःला अपडेट केले पाहिजे. मुलांचे उज्वल भविष्यासाठी पाया मजबूत केला पाहिजे. आणि असे जर झाले नाही तर येत्या दहा वर्षात खेळाडू शोधणे मुश्कील होऊन जाईल देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर हा अग्नी गाव ,जिल्हा ,राज्य व महाराष्ट्रभर पसरू या व सुदृढ भारत करूया.
या नंतर शिवदत्त ढवळे व अशोक दुधारे यांनी मनोगत व्यक्त केले.
यांचा झाला सत्कार —
या वेळी महाराष्ट्र वोलीबाल असोशीएसनचे अध्यक्ष पार्थ जोशी व छत्रपती पुरस्कार प्राप्त श्वेता गवळी,संजय पाटील ,राजेंद्र पवार ,डा नितीन चवहाळे व इतरांचा सत्कार करण्यात आला.
अधिवेशनात सुमारे 6 हजार शिक्षक उपस्थित होते
सूत्र संचलन राजेंद्र कोहोकडे व बिऱ्हाडे सर यांनी केले व आभार ज्ञानेश काळे यांनी व्यक्त केले