अमळनेरला मंगळ ग्रह मंदिरात झाला शुभांक ” नऊ ” चा धार्मिक धमाका

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात नऊ फेब्रुवारी ला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ” नऊ ” चा धार्मिक धमाका झाला.
नऊ हा श्री मंगळ ग्रहाचा शुभांक आहे . या पार्श्वभूमीवर नऊ फेब्रुवारी रोजी मंदिरासमोरील नियोजित पाच मजली भव्य इमारतीच्या तळ मजल्यावर नऊ कुंडी श्री गायत्री महायज्ञ झाला . या महायज्ञात ३६ जोडपे सहभागी होते . ३६ या अंकातील तीन आणि सहाची बेरीज नऊ होते. ३६ जोडपे म्हणजे ७२ जण . ७२ या अंकातील सात आणि दोन ची बेरीज ही नऊ होते . शिवाय या महायज्ञास सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी प्रारंभ झाला. यातही आठ अधिक एक ची बेरीज नऊ होते.
अशा रीतीने नऊ तारीख, नऊ कुंडी यज्ञ , ३६ जोडपे , ७२ जण व आठ वाजून एक मिनिटांचा मुहूर्त असा एकूणच नऊ या शुभांकाचा आगळा – वेगळा व प्रथमच धार्मिक धमाका संपन्न झाला.
विशेष म्हणजे याच सुमुहूर्तावर श्री मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील नियोजित पाच मजली इमारतीच्या ६५ × ११५ फुटी स्लॅबच्या कामासही प्रारंभ झाला . या स्लॅबला एकही कॉलम नाही , हे विशेष . अद्ययावत पिटी स्लॅबच्या तंत्रज्ञानाचा यात वापर होणार आहे . स्टील डिझाइन दीर्घानुभवी ख्यातनाम अभियंता सतीश लाठी(जळगाव) यांचे आहे . अमळनेरचे वास्तू तज्ञ संजय पाटील यांची इमारत निर्माण कार्यात देखरेख असेल .

शहरातील अशा पध्दतीने पहिलाच धार्मिक विधी झाला . कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रत्यक्ष सहभाग होता. अनेक मान्यवर पूर्णवेळ सोहळा पाहण्यासाठी तर अनेक भाविक यज्ञात आहुती टाकण्या समयी उपस्थित होते . आमदार शिरिष चौधरी , नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील , माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हेही काही वेळ यज्ञाविधित सहभागी झाले होते .जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी ही सदिच्छा भेट दिली. सर्व सहभागी भाविकांना नेते मंडळींनी शुभेच्छा दिल्या . मंगळ ग्रह सेवा संस्थेने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी कौतुक केले . श्रीमती पुष्पाताई भांडारकर , निवृत्त प्राध्यापक सतीश सोनार , छोटूलाल शिंपी यांनी यज्ञाविधीचे निरुपणासह संचालन केले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी , तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य गायत्री परिवाराच्या सौ.सुनेत्रा भांडारकर यांनी सहकार्य केले.
संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाद्यक्ष एस.येन.पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव , गोटू बडगुजर व मंदिरातील सेवेकऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *