खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्

अमळनेर : जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्था जळगांव च्या तज्ञ संचालक पदी पारोळा येथील बालाजी विद्यालयाच्या उपशिक्षिका कविता भीमराव ठाकरे यांची पतसंस्थेच्या अध्यक्षा सरला पाटील उपाध्यक्ष प्रशांत साखरे व संचालक मंडळाने तज्ञ संचालक म्हणून निवड केली आहे. कविता ठाकरे ह्या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्यांना त्यांच्या माहेरी वडील भीमराव ठाकरे व सासरे कै. वसंतराव पाटील दोघे शिक्षक यांच्याकडून वारसा लाभला आहे. त्यांच्या निवडीबद्दल महासंघाचे राज्य सचिव अशोक मदाने, सदस्य टी.के. पाटील, व बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील,अमळनेर तालुका खाजगी प्राथमिक महासंघाचे अध्यक्ष आशिष पवार व सचिव स्वप्नील पाटील.सानेगुरुजी विद्यामंदिर अमळनेर ,बालाजी विद्यालय पारोळा येथील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *