अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा निवडणुकीत इच्छुकांकडून आतापासूनच विविध समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी धडपड सुरू आहेत. एका नेत्यांकडून पाठिंबा मिळाल्याचे जाहीर केले जात आहे. दुसऱ्या दिवशी त्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणताही पाठिंबा दिला नसल्याचा खुलासा केला जात आहे. मग पाठिंबा दिला कोणी, असा प्रश्न निर्माण होत आहे. एका नेत्याला समाजातील काहींचा पाठिंबा तर दुसऱ्या नेत्याकडून दबाव येत असल्याने पाठिंबा नसल्याचा खुलासा केला जात आहे. असाच प्रकार सध्या शहरात सुरू झाला आहे. नुकतेच श्री क्षेत्र काच माळी समाज मंडळ आणि महाराष्ट्रीय चर्मकार समाज संघाने पाठिंबा न दिल्याचा खुलासा करण्यात आला आहे.