अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे अमळनेर व पारोळा तालुक्याचे स्काऊट गाईड विभागाचे एकदिवसीय संघनायक शिबिर झाले.
शिबिराचे उद्घाटन स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर तसेच गाईड विभागाच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे, कागणे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या भाषणात विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी अंगी असलेल्या गुणांची ओळख पटवून दिली. सदर शिबिरात हेमा वानखेडे यानी विद्यार्थ्यांकडून स्काऊट गाईडची प्रार्थना, नियम, वचन, ध्येय, गाठी घेतले.रा.का मिश्र कनिष्ठ महाविद्यालया बहादपुरचे चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार तसेच नंदा साळुंखे यांनी होकायंत्र याबद्दल माहिती सांगितली. कागणे यांनी आपल्या मधुर आवाजात विद्यार्थ्यांना गाणी ऐकून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. प्रशिक्षणाच्या आयोजनात स्वामी विवेकानंद स्कूलचे प्रशांत कापडणे, राहुल चौधरी व डी. आर. कन्या शाळेच्या गाईड कॅप्टन योगेश्री पाटील यांनी केली. प्रशिक्षणात अंमळनेर व पारोळा तालुक्यातून १५० स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.