अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित रसायनशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पेक्ट्रॉसकॉपीक मेथड्स इन केमिस्ट्री ” या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यान देण्यासाठी रसायनशास्त्र विभाग, एन बी मेहता सायन्स कॉलेज, गोखले एज्युकेशन सोसायटी, बोर्डी, पालघर येथील प्रा.डॉ.कीर्ती कुमार पटेल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.