कर्तव्यात कोणाशीही वापरला नाही असंविधानिक शब्द : सुनील नंदवाळकर
अमळनेर (प्रतिनिधी) अंगावरच्या खाकीला कोणताही डाग लागू न देता प्रामाणिकपणे कायद्याचे रक्षण करणारे डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांची सेवानिवृत्तीनिमित्त रथातून मिरवणूक काढत अमळनेरकरांनी जाहीर सत्कार करीत चांगल्या कामाची पावती दिली. तर या निरोप समारंभाला उपस्थित जनसमुदयला पाहून तेही भारवले.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर सेवानिवृत्त झाल्याबद्दल अमळनेर नागरी सत्कार समितीतर्फे त्यांची छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून बन्सीलाल पॅलेसपर्यंत रथावरून मिरवणूक काढण्यात आली व त्यांनंतर विविध संस्था व घटकांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील होते. नंदवाळकर पुढे म्हणाले की मी चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला म्हणून मला चांगले शिक्षक व लोक मिळाले. मी कर्तव्यात असताना कोणाशीही असंविधानिक शब्द वापरला नाही. पोलिसांकडून अधिकाऱ्यांकडून काम करून घेतले पण कोणाचे नुकसान केले नाही. म्हणून हा जनसमुदाय माझ्या सत्कारासाठी जमला आहे. प्रवृत्ती ही अनुभव व परिस्थिती नुसार बदलत असते. प्रवृत्तीमध्ये सुधारणा घडवून आणता येते. पोलिसांना अनेकदा व्यासपीठावरून शिवराळ भाषा वापरली जाते मात्र पोलीस निमूटपणे सहन करत त्याचाच बंदोबस्त व सुरक्षा करीत असते त्यामुळे पोलीस खाते साधू संतांचे खातेच म्हणावे लागेल. मी देखील मनुष्यावर प्रेम करणारी व्यक्ती आहे म्हणूनच आज माझ्या निरोप समारंभाला ही गर्दी जमली आहे आणि माझी रथातून मिरवणूक काढण्यात आली असे ही ते म्हणाले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, ॲड. शकील काझी, ॲड. ललिता पाटील, तिलोत्तमा पाटील, सुभाष चौधरी, चेतन राजपूत, प्रांताधिकारी महादेव खेडकर, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, प्रा.अशोक पवार , मोठे बंधू राजेंद्र बडगुजर, अनिल बडगुजर, शरद पाटील, सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर शेळके, संजय बडगुजर, नंदुरबार एपीआय राहुल शेजवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन डॉ.अनिल शिंदे , अर्बन बँकेचे व्हॉ. चेअरमन रणजित शिंदे, धुळे पंचायत समितीच्या सदस्या सुरेखा बडगुजर, जळगाव पीआय सागर शिंपी उपस्थित होते.
प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर.जे. पाटील यांनी केले. कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, भारती शिंदे, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, उपाध्यक्ष माधुरी पाटील, संचालक योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल,संजय चौधरी, विश्वस्त वसुंधरा लांडगे,नरेंद्र संदानशिव,प्रा. शीला पाटील, प्रवीण जैन, किरण पाटील, जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, महेंद्र पाटील, प्रा. विजय गाढे, नूर खान, उमेश काटे, राजाराम बडगुजर, कवी शरद धनगर, मुकेश बडगुजर, विकी जाधव, रोहित बठेजा, सोमचंद संदानशिव, प्रमोद बागडे, सुनील हटकर, मुकेश साळुंखे, भटू तोमर, गणेश पाटील, संजय बोरसे, हितेश बेहरे, मनोज शिंगाने, राहुल कंजर, अमळनेर तालुका बडगुजर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.