पाडळसरे धरणासाठी जनता त्रस्त ; मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…. जलसंपदामंत्री आश्वासन देण्यात मस्त ; येणाऱ्या निवडणुकीत पुढारी व्यस्त.

पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समितीचे शिवजयंती पासून साखळी उपोषण सुरू होणार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील
पाडळसरे धरण संदर्भात संघर्ष समितीचे शिवजयंती १९ फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू होणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
बुधवारी सांयकाळी येथील मामा ट्रान्सपोर्ट येथे संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, पाडळसरे धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, एस एन पाटील, देविदास देसले आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सदस्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना ५ एप्रिल २०१८ रोजी पाच तालुक्यातील जनतेने युद्धपातळीवर धरण पूर्ण व्हावे यासाठी अभूतपूर्व असा प्रतिसाद देत मोर्चा काढला होता. तालुक्यातील व शहरातील प्रत्येक घटक सदरच्या मोर्चात सहभागी झाला होता सदरच्या मोर्चाच्या रुद्रावतार पाहून भाजपच्या प्रतिनिधींनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे लाइव्ह भाषण लोकप्रतिनिधीनी ऐकवले होते त्यात मंत्री महाजन यांनी आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही. त्यानंतर जलसंपदा मंत्री महाजन यांच्या मुंबई निवासस्थानी आंदोलन सदस्यांनी भेट घेतली होती त्यावेळी नाबार्ड कडून २३०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.
त्याचप्रमाणे जामनेर येथे शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती महिनाभरात काम चालू होईल असे आश्वासन दिले होते परंतु तेही आश्वासन पूर्ण झाले नाही त्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे.
लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सतीश पाटील हे या पाच तालुक्यातील लोकप्रतिनिधी असून त्यांच्या तालुक्यातील जनता या लाभक्षेत्रातील आहे त्यांनी देखील युद्धपातळीवर प्रयत्न केला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी या साखळी उपोषणास “अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने” पाठींबा दिला आहे तसेच प्रत्येक गावातील शेतकरी सहभागी होणार असून जोपर्यंत ठोस निधीची तरतूद होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा संघर्ष समितीच्या नेत्यांनी दिला आहे. ५ एप्रिल रोजी मोर्चा ६ ऑगस्ट रोजी भीक मांगो आंदोलन समितीने केले होते त्यानंतर आता साखळी उपोषण करण्यात येणार असून निवडणुकीच्या तोंडावर हे उपोषण शासनाला व लोकप्रतिनिधींना डोकेदुखी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *