पु.ल.देशपांडे,ग.दि.माडगूळकर व सुधीर फडके आदी महान विभूतींचा रंगला जन्मशताब्दी सोहळा
अमळनेर-येथील लाड शाखीय वाणी समाजाच्या सुयोग् महिला मंडळाचा 30 वा वर्धापन दिन दि 26 जानेवारी रोजी उत्साहात साजरा झाला,यानिमित्त पु.ल.देशपांडे,ग.दि.माडगूळकर व सुधीर फडके आदी महान विभूतींच्या जन्मशताब्दी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या निवेदिका म्हणून पुणे येथील सौ स्मिता अमृतकार,केले यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले,तसेच अमळनेर येथील प्रसिद्ध गायिका सौ मोहिनी खाडिलकर व सौ स्वाती बोरकर यांनी उत्कृष्ठ गाणे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली त्यांना नागेश खोडवे व तबला वादक योगेश संदानशिव यांची साथसंगत लाभली.यावेळी महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,उत्कृष्ठ सादरीकरणामुळे सर्वांनी निवेदिका सौ अमृतकार व गायिकांचे विशेष कौतुक केले.सर्वांचा मंडळाच्या अध्यक्षा सौ उज्वला प्रकाश शिरोडे यांचेसह कार्यकारिणीच्या वतीने सत्कार केला तर वर्षभरात उल्लेखनीय कार्यक्रम घेतल्याबद्दल अध्यक्षांसह कार्यकारिणीचे महिलांनी कौतुक केले.तसेच संगित अलंकार हि नामांकित पदवी मिळवून संगीत क्षेत्रात विशेष नावलौकिक मिळविणारे अमळनेरचे भूमिपुत्र डॉ अमोघ अविनाश जोशी व उतरत्या वयात अमळनेर महिला मंचची स्थापना करून महिलां सक्षमीकरणासाठी महिला महोत्सव व विशेष कार्य करणाऱ्या डॉ सौ अपर्णा मुठे यांचा सत्कार यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आला.
लाड शाखीय वाणी मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला,लाड शाखीय वाणी पंच मंडळाचे संचालक पंकज काशिनाथ मराठे यांच्या भरीव योगदानातून हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्षा सौ उज्वला शिरोडे,उपाध्यक्षा सौ मंगला मनोहर ब्राह्मणकार,सेक्रेटरी सौ अरुणा अनिल अलई,सह सेक्रेटरी सौ अर्चना दीपक तलवारे,खजिनदार सौ वर्षा मिलिंद कुडे,संयोजक सौ शकुंतला सुधाकर येवले,सहसंयोजक सौ पुष्पा पंढरीनाथ नेरकर,सल्लागार श्रीमती रजनी केले,कार्यकारी संचालिका सौ रेखा अरुण मार्कण्डेय,सौ शारदा सुभाष कोठावदे,सौ रेखा राजेंद्र मोरांणकर,सौ जयश्री योगेश येवले,श्रीमती पुष्पा भामरे,सौ छाया दिलीप कोठावदे,सौ शोभा अविनाश ब्राह्मणकार आदींनी परिश्रम घेतले.