अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील धावडे येथील चुलत पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काका ला न्यायालयाने ८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
धावडे येथील गोकुळ एकनाथ पाटील याने ५ ते सहा महिन्यांपूर्वी आपली १४ वर्षाची पुतणी घरात एकटी असताना तिच्या तोंडावर रुमाल दाबून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता ती गर्भवती राहिल्याने तिला उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले होते जिल्हा पेठ पोलिसांनी घेतलेल्या जबाबनुसार अहवाल अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गोकुळ पाटील विरुद्ध भादवी ३७६ (२) सह , बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ५ (१)(२), ६ ,८ ,१२ पोस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीस ५ रोजी रात्री अटक करण्यात आली होती त्याला पी.एस.आय.चंद्रकांत चातुरे यांनी न्यायालयात हजर केले सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला न्या.राजीव पांडे यांनी आरोपीस ८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.