मुडी प्र डांगरी येथे एकाच दिवशी मुलासह वडिलांनी घेतला जगाचा निरोप

अमळनेर (प्रतिनिधी) एकाच दिवशी वडिल आणि मुलाचे निधन झाल्याची दुःखद घटना मुडी प्र डांगरी येथे घडली. यामुळे त्या कुटुंबावर शोककळा पसरली आहेत. तर गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुडी येथील रहिवाशी व जालना येथे वास्तव्यास असलेल्या सूर्यवंशी कुटुंबातील मुलगा गौरव राजेंद्र सुर्यवंशी (वय ३८ ) अल्पशा आजाराने रुग्णालयात दाखल झाले होते. या तरुणाचे दुसऱ्याच दिवशी  दि. २६ रोजी पहाटे २ वाजता निधन झाले. गौरव हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. तर त्याचे वडील राजेंद्र रामचंद्र सुर्यवंशी (वय ६८ ) यांनीही दि २६ रोजी  रात्री १० वाजता जगाचा निरोप घेतला. राजेंद्र सूर्यवंशी हे जालना जिल्ह्यात तालुका कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले होते. दरम्यान ते संभाजीनगर येथे १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल झालेले होते. तर त्यांची शुश्रूषा पत्नी व मुलगा करत होते. गौरव हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तर त्यांची पत्नी आताच सेट परीक्षा उत्तीर्ण झाली होती. दरम्यान पोटाच्या अल्प आजाराने औरंगाबाद येथेच तो देखील रुग्णालयात दाखल झालेला होता. रात्री अचानक पोटात रक्तस्त्राव झाल्याने २६ रोजी पहाटे २ वाजता त्याने जगाचा निरोप घेतला तर वडील देखील अखेरचे क्षण मोजत असतांना व्हेंटिलेटरवर होते. दरम्यान वडिलांचे देखील व्हेंटिलेटर काढताच २ तासात निधन होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. म्हणून कार्डियाक रुग्णवाहिकेतून राजेंद्र यांना तर दुसऱ्या शववाहिनीतुन गौरव याला आणण्यात आले. त्यानंतर २६ रोजी सायंकाळी ५ वाजता गौरव याच्यावर अंत्यसंस्कार झाले तर रात्री १० वाजता वडील राजेंद्र सुर्यवंशी यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर दि २७ रोजी मुडी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी वडीलांसह मुलाचे निधन झाल्याने सूर्यवंशी परिवारावर दुःखाचे सावट पसरले. तसेच दोन दिवसांपूर्वी राजेंद्र सूर्यवंशी  यांचे साडू कळमसरे येथे सेवाव्रत डॉ. सतीश सोनवणे (मुडी) यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले. राजेंद्र यांना २ मुले पत्नी असा परिवार आहे. त्यात एक गौरव त्याला एक मुलगा एक मुलगी पत्नी असा परिवार आहे. असे कुटुंबीय आहे. एक मुलगा शिक्षण घेत आहे. राजेंद्र हे मुडी येथील रहिवासी व पुणेस्थित सेवानिवृत्त शिक्षक रमेश रामचंद्र सूर्यवंशी यांचे लहान बंधू आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *