अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालय, उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल विभागात “संशोधन प्रकल्प लेखन व सादरीकरण तंत्र” या विषयावर एक विशेष व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एरंडोल येथील डी. डी. एस. पी. महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. अरविंद ए. बडगुजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन होते.
प्रारंभी डॉ. बडगुजर यांनी संशोधन, शोध, आविष्कार आणि नवनिर्मिती यातील फरक साध्या उदाहरणांसह स्पष्ट केला. कार्यक्रमास डॉ. प्रमोद चौधरी, प्रा. ए. ए. शिरसाठ, प्रा. भूषण पवार, प्रा. चंद्रशेखर वाडे, प्रा. चंद्रकांत जाधव, प्रा. प्रीतम पावरा उपस्थित होते. तसेच, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. प्रविण धनगर, श्री. महेश (बाळा) राजपूत यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. महेंद्र महाजन यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. किरण गावित यांनी करून दिला. भूगोल विभागप्रमुख डॉ. कैलास निळे यांनी आभार मानले.