अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कौशल विकास द्वारे देवगाव देवळी येथील सरस्वती महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे आचार्य चाणक्य केंद्रात करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधानांनी आचार्य चाणक्य या योजनेस सक्रिय ठेवण्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल व कौशल्याचा विकास होण्यासाठी सरकार कटीबद्ध राहील, असे प्रतिपादन केले. त्यावेळी दूरदृश्य ऑनलाईन प्रणालीद्वारे पंतप्रधान संपूर्ण महाराष्ट्राच्या कौशल्य केंद्रांना संबोधित करत होते. दूरदृश्य ऑनलाईन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कौशल्य विकास मंत्रालयाचे मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. कार्यक्रम सरस्वती महाविद्यालयाच्या मुख्य सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम पार पाडला. त्यावेळी योजनेचे शासकीय अधिकारी आर. ए. पाटील, प्राचार्य डॉ. डी. एस. भावसार , प्रा. पी. ए बारी, प्रा. रोहित पाटील, प्रा. डी. बी. सातपुते, प्राध्यापक एम. एस. चौधरी, प्राध्यापक विजया पाटील उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष पी. एच. पाटील यांनी महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे उद्घाटन करून आचार्य चाणक्य या कौशल्य विकास योजनेचा ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला.