अमळनेर (प्रतिनिधी)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळ अमळनेरतर्फे जागतिक स्मृती दिनानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला.
सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ जिममध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांचनताई शहा होत्या. अमळनेर तालुक्यातील श्रेष्ठ नामांकित स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजिरी कुलकर्णी या प्रमुख वक्त्या होत्या. त्यांनी विशिष्ट वयानंतर स्मृती भ्रंश कसा होतो त्याची कारणे व त्यावरील उपाय यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली. ज्येष्ठ महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे उत्तम प्रकारे समाधान केले. कार्यक्रमाची सुरवात साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली. मंडळाच्या अध्यक्षा भारती बी. पाटील, गायत्री भदाणे, छाया पाटील, भारती गाला, प्रा. उषा पाटील, सुरेखा बाविस्कर, चंद्रकला पाटील, सुनंदा चौधरी, पद्मजा पाटील, मिनाक्षी पाटील (मारवड), साळुंखे,अरुणा शिरसाळे यांनी सहभाग घेतला होता. प्रास्ताविक प्रा.शीला पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मंडळाच्या उपाध्यक्षा वसुंधरा लांडगे यांनी केले. आभार रत्ना भदाने यांनी मानले.