अमळनेर तालुक्यातील काळीमा फासणारी घटना
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील धावडे येथे एका नराधमाने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी धावडे येथे घडलेली होती ती घटना उघडकीस आली पीडित मुलीवर बलात्कार केल्याने ती चार महिन्यांची गरोदर राहिली असून उपचारांसाठी तिला जळगांव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हा प्रकार उघड झाल्यानंतर मुलीवर अत्याचार करणारा हा नराधमाविरुद्ध पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
धावडे येथे ५ ते सहा महिन्यांपूर्वी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी खाटेवर झोपली असताना गोकुळ एकनाथ पाटील याने घरात घुसून तिच्या तोंडावर रुमाल दाबून तू आरडाओरड करू नको असे बोलून तिच्यावर अतिप्रसंग करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला ती बालिका ४ महिन्याची गर्भवती राहिल्याने जळगाव जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते जिल्हा पेठ पोलिसांनी अमळनेर पोलिसांना अहवाल पाठवल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी गोकुळ एकनाथ पाटील विरुद्ध बलात्कार चा व पोस्को कायद्यनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला तात्काळ मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या बलात्कार प्रकरणी तपास पी.एस.आय.चंद्रकांत चातुरे करीत आहेत.
रोज सकाळी ऑनलाइन बातमी,वृत्तपत्र उघडल्यावर एक दिवसही असा जात नाही की, ज्या दिवशी एखाद्या स्त्रीवर वा अल्पवयीन बालिकेवर बलात्कार झाल्याची बातमी आलेली नाही. समाजाच्या सुसंस्कृतपणाला लागलेली ही कीड महाभयंकर आहे आणि सामाजिक नीतिमत्तेला सुरुंग लावणारी आहे. स्त्रियांवर केले जाणारे बलात्कार हे जगात सर्वत्र घडत असतात, पण अविकसनशील देशात अशा तक्रारी पोलिसांपर्यंत येण्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. एकूण बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तींकडून होतात.
जमीनदार आपल्या स्त्री मजुरांवर बलात्कार करतात, कारखानदार, मालक, अधिकारी आपल्या हाताखालच्या स्त्रियांवर, तर बॉस, नातेवाईक, शिक्षक, ड्रायव्हर, पुढारी, दादा लोक ओळखीमुळे दिशाभूल करून स्त्रीचा फायदा घेतात. प्रत्यक्ष बलात्कार करणाऱ्यांपेक्षा संभाव्य बलात्कारी (पोटेन्शिअल रेपिस्ट) संख्येने कितीतरी पट असतात, असे लोक संधीची वाट पाहत असतात आणि संधी मिळाली की ते स्त्रीवर बलात्कार करून प्रसंगी तिचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही.किंवा लाख दोन लाख देऊन प्रकरण मिटवायला कमी करत नाही.
बलात्कारांच्या संदर्भात स्त्री चळवळींचा विचार केला तर स्त्री संघटनांनी या विरोधात फार मोठा आवाज उठवून आपल्या आंदोलनाच्या रेटय़ाने कायद्यात काही विधायक बदल घडवून आणले पाहीजे.