प्रताप महाविद्यालयात पदार्थ विज्ञान विभागातर्फे व्याख्याने

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत पदार्थ विज्ञान विभागामार्फत व्याख्याने झाली.यात दिनांक 14 सप्टेंबर रोजी साने गुरुजी सभागृहात डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रविण मोरे यांचे  “द फिजिक्स ऑफ सेन्सर्स And इट्स अँप्लिकेशन्स ” ह्या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव डॉ. धिरज वैष्णव व महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक  डॉ.मुकेश भोळे हे होते. प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन व डॉ.धीरज वैष्णव यांचे स्वागत विभाग प्रमुख डॉ.जयंत बी. पटवर्धन यांनी केले. यावेळी डॉ.मुकेश भोळे यांचे स्वागत डॉ. एस.डी. बागुल यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.अमित पाटील यांनी केले तर  आभार डॉ. चित्रा मल्लेला यांनी मानले.तर  दिनांक  20 सप्टेंबर रोजी पदार्थ विज्ञान विभागात इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. आर. आर. देशमुख ह्यांचे “प्लास्मा : द फोर्थ स्टेट ऑफ मॅटर अँड इट्स अँप्लिकेशन्स ” ह्या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख डॉ.जयंत बी. पटवर्धन तर प्रमुख पाहुणे म्हणून  महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे हे होते. डॉ. आर. आर. देशमुख सर व डॉ. मुकेश भोळे यांचे स्वागत विभाग प्रमुख डॉ. जे. बी. पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. अमित पाटील यांनी केले. प आभार डॉ. प्रियांका पाटील यांनी मानले.वरील दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *