जुलूसमध्ये आक्षेपार्ह घोषणा आणि फायर करणाऱ्या समाज कंटकांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून ईदनिमित काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या आक्षेपार्ह घोषणा देत धार्मिक भावना दुखवणाऱ्या आणि फायर करणाऱ्या समाज कंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १९ रोजी शहरातून ईदनिमित काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील गैरप्रकाराची माहिती मिळताच खासदार स्मिता वाघ यांच्यासह ३०० ते ४०० लोकांचा जमाव पोलीस स्टेशन मध्ये जमला होता. खासदार स्मिता वाघ आक्रमक झाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी योग्य तक्रार द्या गुन्हा अवश्य दाखल केला जाईल कोणालाच माफ केले जाणार नाही असे आश्वसन दिले होते. भाजपचे शहराध्यक्ष विजय राजपूत यांनी आज २१ रोजी  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की १९ रोजी  वाजेदरम्यान ईदनिमित शहरातून जुलूस काढण्यात आला. दुपारी मिरवणूक झामी चौकात आली असता काही लोक आक्षेपार्ह घोषणा देऊन शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका अनोळखी माणसाने तोंडाला रुमाल बांधून गावठी पिस्तुलने दोनवेळा फायर केला. नंतर बाजार पेठेत जुलूस आल्यानंतर एका अनोळखी इसमाने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारताच्या सर्वभौमत्व व एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणण्याच्या उद्देशाने घोषणा देत होता. तसेच जुलूस मधील शाहरुख छोटा मेवाती रा कसाली डी पी , शोहेब आबीद मिस्तरी ,फयजाज आरिफ , दानिश शेख मुख्तार रा शाहआलम नगर ,कुबा भाई रा चुना घाणी परिसर , सलमान रफा व कालु भाजीवाल्याचा मुलगा रा. जिनगर गल्ली व इतर काही व्यक्तीं चिथावणीखोर घोषणा देत होते. दुपारी ३ ते ४ दरम्यान जुलूस मधील काही व्यक्ती हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले व मांगीर बाबांचे स्मारक असलेल्या दगडी दरवाजाच्या बुरुजावर चढून हिरवा झेंडा फडकवून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या व गावात दहशत निर्माण केली. अशी फिर्याद दिल्यावरून आरोपींविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे , शस्र  कायदा आदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.

 

गुलाल फेकून भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

 

दरम्यान कसाली मोहल्ल्यातील इकबालखान अकबरखान कसाली मोहल्ल्यातील जामा मशिदीचे ट्रस्टी यांनी फिर्याद दिली की १७ रोजी गणेश विसर्जन मिरवणूक जात असताना माळीवाड्यातील त्रिमूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष रोहित हेमराज महाजन (रा. माळीवाडा) व इतर सदस्य यांनी जामा मशिदीवर गुलाल फेकून आमच्या भावना दुखावल्या. तसेच दगडी दरवाज्याबाहेर पिपरीवाडा दर्ग्यावर देखील गुलाल फेकला. याबाबत ट्रस्टीची बैठक होऊन त्यांच्यासोबत चर्चा करून अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

 

दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी

 

दरम्यान याबाबत डीवायएसपी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दोन्ही प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करणार असून दोषींना लवकरच अटक केली जाईल असे सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *