खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पावरुन 25 आमदार आणि मंत्र्यांना साडी चोळीचा आहेर

अमळनेर (प्रतिनिधी ) नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पावरुन आंदोलक आक्रमक झाले असून त्यामुळे दिग्गज मंत्री आणि आमदारांना थेट साडी चोळीचा आहेर भेट म्हणून पाठवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पावरुन महाराष्ट्रातलं वातावरण तापताना दिसत आहे. राज्य सरकारने 10.64 टीएमसीचा प्रकल्प मान्य केला आहे. पण या प्रकल्पावरुन उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. नार-पार खोऱ्यातील 30 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्राला मिळावेत, अशी मागणी खान्देश हित संग्राम संघटनेची आहे. याबाबत उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्री भूमिका मांडत नसल्याचा आरोप करत खान्देश हित संग्राम संघटनेकडून जवळपास 25 आमदार आणि मंत्र्यांना साडी चोळीचा आहेर पाठवण्यात आला आहे. नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्पावर काम न केल्याचा संघटनेचा आरोप आहे की, प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरी ती निवडणुकीचा जुमला आहे. चितळे समितीच्या अहवालानुसार ३० टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्राला मिळणं अपेक्षित आहे. पण राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ १०.६४ टीएमसी पाणी देण्याची घोषणा करून जनतेची दिशाभूल केली आहे, ज्यामुळे खान्देशी जनतेची फसवणूक होत आहे. यावर कुठलेही आमदार आणि मंत्री बोलत नसल्याने आखेर आज खान्देश हित संग्राम संघटनेने या मुद्द्यावर आंदोलनची भूमिका घेत उत्तर महाराष्ट्रातील २५ आमदार आणि मंत्र्यांना कल्याण पूर्वेतून कुरियरद्वारे साडी चोळीचा आहेर पाठवण्यात आले आहे. तर राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्रशासकीय मान्यतेत केंद्रीय परवानग्या मिळवण्याच्या अटी आहेत. पण केंद्र सरकारने हा प्रकल्प अव्यवहार्य ठरवून रद्द केला होता. त्यामुळे हा प्रकल्प खऱ्या अर्थाने सुरू होईल की नाही, हा मोठा प्रश्न आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे.

नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी उत्तर महाराष्ट्रातील जनता तापली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प हा जास्त खर्चिक असल्याने तो व्यवहारीक नाही. त्यामुळेच हा प्रकल्प केंद्राने रद्द केल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली. त्यांनी संबंधित माहिती दिल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. याबाबत जनतेत रोष निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकल्प रद्द झाला नसल्याची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button