खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शांतीदूतांमुळे अमळनेरला यंदा ‘श्रीं’चे झाले विसर्जन शांततेत!

दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंचावरून मिरवणुकांचे अनोखे स्वागत

 

अमळनेर (प्रतिनिधी) परंपरेप्रमाणे शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता प्रस्तापित ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा “श्री सन्मान” मंगळवारी अनंत चतुर्दशीला अमळनेरच्या शांतिदूतांकडून करण्यात आला. या उपक्रमाचे शहरवासियांकडून कौतुक केले जात आहे.

अमळनेर येथील बिर्याणी हाऊसचे संचालक शेखर राजपूत यांच्या वतीने बंदोबस्त साठी असणाऱ्या सर्व कर्मचारी वृंदाना फूड पॅकेटचे वाटप याठिकाणी करण्यात आले. या उपक्रमासाठी गणेशोत्सवात अति संवेदनशील क्षेत्र ठरणाऱ्या दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंच उभारण्यात आला होता, त्याठिकाणीच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शांतताप्रिय मिरवणुकांचे अनोखे स्वागत व सन्मान केला करण्यात आला.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, मुंदडा फाऊंडेशन, अमळनेर, अमळनेर पोलीस स्टेशन, अमळनेर नगरपरिषद आणि महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर आदींच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या वर्षी देखील हा उपक्रम राबविला असता सर्व मंडळांनी भरभरून दाद देत सदर मंचावरून होणाऱ्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले होते. परिणामी कोणताही गोंधळ न होता सर्व मिरवणूक शांततेत पार पडल्या होत्या.  मागील वर्षाचा चांगला अनुभव पाहता पत्रकार संघ आणि मुंदडा फाऊंडेशन यांनी यावर्षी देखील पुढाकार घेतल्याने पोलिस विभाग, नगरपरिषद आणि महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या सर्वांनी यात सहभागी होण्यास सहमती दर्शविली होती. सर्व गणेश मंडळांनी स्वतः शांतीदूत होऊन श्री सन्मानाचे मानकरी ठरावे, असे आवाहन आयोजकांनी केले असल्याने सर्वच मंडळांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आदर्श मिरवणूक काढल्या.

या मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा,पोलीस निरीक्षक विकास देवरे, नपचे मुख्याधिकारी तुषार नेरकर तसेच माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, नर्मदा मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. अनिल शिंदे, उद्योजक मुकुंद विसपुते,खाशी मंडळ उपाध्यक्ष माधुरी पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, लालचंद सैनांनी, उद्योजक विवेक संकलेचा, बी. आर. बोरसे, निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सोमचंद संदानशिव, नपचे बांधकाम अभियंता डिगंबर वाघ, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, आरोग्य निरीक्षक संतोष विऱ्हाडे,महेश जोशी,नरेंद्र संदानशिव, विनोद अग्रवाल, प्रवीण जैन,डॉ चंद्रकांत पाटील यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अखेरच्या दिवशी तसेच सातव्या व नवव्या दिवशी शांततेत विसर्जन करणारे आदर्श मंडळ आणि हिंदू मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी वर्गाला याठिकाणी सन्मानित करण्यात आले. आयोजकांच्या वतीने मुंदडा फाऊंडेशन चे अमेय मुंदडा,योगेश मुंदडा तसेच सर्व पत्रकार बांधव आणि पालिका व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान सदर उपक्रमाची विशेष करून दरवाजाच्या आत पोलिस प्रशासनास मोठी मदत झाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी कौतुक करत सर्वांचे आभार मानले.

 

भरवस महिला मंडळ जिल्हास्तरावर

 

भरवस येथील महिला मंडळाने आदर्श उत्सव साजरा केल्याने या मंडळाची जिल्हास्तरिय पारितोषिकसाठी निवड झाल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी या मंचावरून जाहीर केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button