खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील सर्वाधिक भाविक दर्शन घेणारे आणि सर्वात लोकप्रिय गणेश मंडळ असलेल्या राजे संभाजी गणेशोत्सव मित्र मंडळांने यंदा राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा साकारलेला आहे.

वर्षभर प्रत्येक भक्त हा आपल्या आवडत्या श्री गणरायाच्या आगमनाची म्हणजेच गणेशोत्सवाची प्रतीक्षा करत असतात. सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवात प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो. सर्वांचे लाडके दैवत असलेल्या श्री गणरायाचा उत्सव सध्या सुरू असून यावर्षी देखील शहरातील विविध सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भाविकांना धार्मिक, सामाजिक एकतेचा संदेश देणारे देखावे मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात आलेले आहेत. राजे  संभाजी गणेशोत्सव मित्र मंडळ, बाहेरपुरा हे मागील 37 वर्षापासून गणेशोत्सव काळामध्ये नेहमीच आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे प्रत्येक अमळनेरकराच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. यंदा मंडळाचे 38 वे वर्ष असून  यावर्षी राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा साकारलेला असून मंडळाच्या 16 सभासदांनी विविध पात्र स्वतः साकारून 20 मिनिटांचा सजीव देखावा सादर केलेला आहे. हा देखावा पाहण्यासाठी लहान मोठे भक्तगण मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. तसेच यावर्षी देखील मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये रक्तदान व आरोग्य शिबिरे तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भक्तांसाठी छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा

दरवर्षी सामाजिक एकोपा टिकून राहण्यासाठी देखावे सादर करण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा सादर केलेला आहे. देखावा पाहण्यासाठी लहान मोठ्या श्री भक्तांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव काळात मंडळ इतर सामाजिक उपक्रम देखील राबवते.

हरिश्चंद्र पाटील, अध्यक्ष-राजे संभाजी गणेशोत्सव मित्र मंडळ, अमळनेर

 

आम्ही गणेशोत्सवाची आतुरतेने पहातो वाट

आमच्या मंडळाने सादर केलेल्या सजीव देखाव्यात मला राजे संभाजी महाराजांच्या मातोश्रीचे पात्र सादर करण्याची संधी मिळाली. आम्हा लहान मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन  मिळण्यासाठी गणेशोत्सवात नाटक, सजीव देखावे, यामध्ये पात्र करण्याची सुवर्णसंधी असल्यामुळे आम्ही बालगोपाल गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो.

 

प्रियंका संतोष चौधरी, बालकलाकार, अमळनेर 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button