खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

ग्राहक कल्याण फाउंडेशनतर्फे राज्य अन्न आयोग अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या राज्य अन्न आयोगाचे नव नियुक्त अध्यक्ष (मंत्रिस्तरीय) ॲड. सुभाष राऊत यांचा ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (पारोळा) आणि जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी चिन्ह देऊन सत्कार केला.

ते जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौऱ्यावर असताना अमळनेर येथे माजी उप नगराध्यक्ष अनिल गंगाराम महाजन यांच्याकडे कौटुंबिक भेटीवर आले होते. त्यावेळी हा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हा संपर्क प्रमुख अमळनेर येथील ख्यातनाम विधिज्ञ कुंदन साळुंखे, तालुका अध्यक्ष प्राचार्य रवींद्र माळी, उपाध्यक्ष ॲड. आर. जी. चव्हाण,  संघटनेचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुभाष महाजन, नरेंद्र महाजन, दीपक भोई, रत्नाकर महाजन, सुरेश पाटील, पांडुरंग महाजन, प्रताप पाटील, संजय महाजन, ॲड. विवेक लाठी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button