अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील तालुकास्तरीय संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने तहसिलकार्यालया समोर तालुक्यातील विविध सामाजिक वर्गाच्या समूहाने शांततेच्या व संविधानिक मार्गाने एकदिवसिय धरणे आंदोलन करण्यात आले. तहसिलदार यांचेवतीने तहसिलप्रतिनिधी बोरसे यांनी विविध मागण्याचे निवेदन स्वीकारले.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात चर्चा न करता मंजुर केलेले आर्थिक निकशावरील १० टक्के आरक्षणाचे विधेयक विनाविलंब रद्द करावे. एस.सी.एस.टी व ओ बी सी यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रर्याप्त प्रतिनिंधीत्व दिले जावे.ओ बी सी वर लावलेला क्रिमिलेयर रद्द करावे. ओ बी सी ,एन टी, डी एन टी ,व्ही जे एन टी यांची जातीनिहाय जनगणना केली जावी.खाजगी क्षेत्रात आरक्षणाचा कायदा बनवून लागु करावा .एस.सी. एस.टी. अन्याय अत्याचार निवारान कायदा अधिक मजबुत करावा. आागामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरने मतदार करण्यात यावे प्रमुख इत्यादी मांगण्यासह संविधान बचाव संदर्भात मा महामहिम राष्ट्रपती यांना तहसिलदारा मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनावर संयोजक रणजित शिंदे, यांच्यासह राष्ट्रीय किसान मोर्च्याचे शिवाजी पाटील, विभागीय अध्यक्ष हिरालाल पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण देशमुख, मौलाना रियाज, गुलाम नबी, नाविद शेख, कुदरत अली, गावरणी जागल्याचे विश्वास पाटील, योगेश पाटील, ,तेली महासंगाचे संजय चौधरी,चेतन चौधरी, भारतीय बौद्ध महासभाचे, सिद्धार्थ सोनावणे,महिला संघाचे शिला सोनावणे, सरला संदांनशीव,विध्यार्थी मोर्च्याचे नितीन सैदाने, प्रवीण बैसाने, राष्ट्रीय मुस्लिम मोर्च्याचे मोहसीन पठाण,युथ काँग्रेस चे मुकेश राजपूत, भारिप तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे, युवा अध्यक्ष अरविंद बिऱ्हाडे,धनगर महासंघ चे विशाल पाटील,समाधान धनगर,संत भीमा भोई चे देविदास भोई,संभाजी ब्रिगेड चे उमेश बोरसे, आदिवासी संघटनेचे एम व्ही पारधी, भूषण साळूखे,संत सेना चे आबा फुलपगारे, बीएसपी चे देवदत्त संदांशीव, अशोक मोरे, रमेश जाधव,एड अभिजित बिऱ्हाडे, एड शकील काजी,एड विजय ढिवरे, एड शिवकुमार ससाणे,आरपीआय तालुका अध्यक्ष यशवंत बैसाने,सामाजिक कार्यकर्ते जयवन्त शिसोदे, योगेश पाटील, प्रा विजय तुंटे, प्रा गुलाले, प्रा विजय खैरनार,दिनेश बिर्हाडे, माळी महासंगाचे अमोल माळी, जय आदिवासी युवा शक्ती चे जिल्हा अध्यक्ष विकास सोनवणे, तालुका अध्यक्ष महेंद्र पवार, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप सैदाने,इंटक चे माजी अध्यक्ष रमाकांत शिंदे, हिंगोनेचे सरपंच सुनील सोनवणे, मेहरगाव सरपंच शरद पाटील, सावखेडा गावचे सरपंच पती याआत्माराम अहिरे, एस टी कामगार संघटनेचे शाह कयुम, बहुजन रयत परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश बोरसे, सुरेश कांबळे, संजय मरसाळे, प्रा जितेश संदांशीव, अविनाश बिऱ्हाडे, मिलिंद निकम, कमलाकर संदांशीव, राजू मोरे, किरण मोहिते, आतिष बिऱ्हाडे, विजय वाडेकर, विजय गाढे, अनेक सहयाचे निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनाला समाजातील सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.