खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पोलिसांची चाहूल लागल्याने ट्रॉली सोडून वाळूचोर फरार

महसूल प्रशासन झोपलेलेच, अवैध वाळू वाहतुकीच्या कारवाईकडे दुर्लक्ष

 

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील बोहरा शिवारात वाळूचोराला पोलिसांची चाहूल लागल्याने त्याने ट्रॉली सोडून ट्रॅक्टरचे धड घेवून पळ काढल्याची घटना १५ रोजी घडली आहे. यामुळे तालुक्यात अजूनही वाळू चोरी सुरू असल्याचे स्पष्ट होते. तर पोलिसांना वाळू चोरीचा सुगावा लागतो आणि महसूल प्रशासन झोपलेले असते, असे बोलले जात आहे.

तालुक्यातून वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकांची नियुक्ती केली आहे. मात्र ही पथके अनेक दिवसापासून निष्क्रिय झाली आहेत की वाळूने हात ओले झाल्यामुळे कारवाई करत नाही, असं प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नियमित कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने वाळू चोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. तर १५ रोजी सकाळी १० वाजता बोहरा शिवारात पोलिसांचे वाहन येत असल्याची चाहूल वाळू चोराला लागल्याने त्याने वाळूने भरलेली १ लाख रुपये किंमतीची निळ्या रंगाची ट्रॉली जागेवर सोडून पळ काढला. पोलिसांनी दुसरे ट्रॅक्टर बोलवून ट्रॉली पोलीस ठाण्यात नेत अज्ञात वाळू चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेकॉ विनोद साळी हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button