खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रोटरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांनी शाकाहार, निसर्ग चित्र व आदर्श व्यक्ति या विषयवार चित्रे रेखाटली.

अमळनेर येथील रोटरी क्लब  विविध स्पर्धा व समाजसेवी उपक्रम राबवत असते. रोटरीने क्लबने घेतलेल्या स्पर्धेत अमळनेर शहरातील पीबीए इंग्लिश मिडीयम, ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मिडीयम,श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळा , स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल , सी.आर. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, नॅशनल उर्दू हायस्कूल ,पर्ल इंग्लिश मीडियम स्कूल, अ‍ॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल, सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे दोनशे पन्नास विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धा 4 गटात घेण्यात आली. तिसरी व चौथी एक गट, पाचवी व सहावी दुसरा गट, सातवी व आठवी तिसरा गट, नववी व दहावी चौथा गट. चार गट मिळून स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चित्र स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी शाकाहार, निसर्ग चित्र, गणपती,विविध आदर्श व्यक्ति या विषयावर चित्र काढली व रंगवली. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पट्टी, बिस्किट व चॉकलेट देण्यात आले. दोन तास चाललेल्या या चित्र स्पर्धेत दिनेश पालवे, दिलीप पाटील, ,अशोक पाटील, हर्षा सपकाळे यांनी सर्व स्पर्धेची जबाबदारी सांभाळली.चित्र स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब प्रेसिडेंट ताहा बुकवाला , सेक्रेटरी विशाल शर्मा, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शरद बाविस्कर, प्रोजेक्ट चेअरमन देवांग शाह, सदस्य डॉ. राहुल मुठे, रोहित सिंघवी, प्रा.दिलीप भावसार,  विजय पाटील, कीर्ति कोठारी , विजय माहेश्वरी, सुहास राने, अभिजीत भंडारकर, दिनेश रेज़ा या सर्वांनी सहकार्य केले. चित्र स्पर्धेचा निकाल 22 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. तो आपल्या शाळेत कळविला जाईल असे, अशी माहिती रोटरी क्लबने दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button