सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली 97 कोटी निधीची मागणी,तहसील व प्रांत कार्यालयाच्या इमारतीचाही समावेश
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदार संघातील विविध रस्ते व पुलाच्या कामास मंजुरी देण्याची मागणी आ शिरीष चौधरी यांनी राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली असून एकूण 97 कोटी निधीची मागणी त्यांनी केली आहे,यात अमळनेर येथील तहसील व प्रांत कार्यालयाच्या इमारतीचाही समावेश असून या मागणीवर मंत्र्यांनी सकारात्मक शिफारस करत निधी उपलब्दतेचे संकेत दिले असल्याची माहिती आ चौधरी यांनी दिली.
अमळनेर येथील तहसील कार्यालय व प्रांताधिकार्यालयाच्या इमारती सुमारे 100 वर्षांपूर्वीच्या असून सदर इमारती जीर्ण झाल्याने त्या नव्याने बांधकाम करणे अत्यावश्यक आहे,या इमारतीचे अंदाजपत्रक सार्व बांधकाम विभागातर्फे तयार करण्यात आले असून अंदाजपत्रकीय किंमत 18 कोटी आहे,तरी या रकमेस मंजुरी देण्याची मागणी आ चौधरी यांनी लेखी पत्रांवये ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याने मंत्र्यांनी प्राधान्याने हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत निधीची मागणी
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अमळनेर मतदार संघातील रस्ते व पुलाच्या कामाना मंजुरी देण्यासाठी संबधित विभागांना आदेश देण्याची मागणी आ चौधरी यांनी ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली असून या कामाना मंजुरी मिळाल्यास मतदार संघातील जनतेस तालुक्याच्या ठिकाणी व दुसऱ्या जिल्ह्यात जाणे सोईचे होणार आहे.यात 1)वावडे ते कावपिंप्री 17 कोटी 21 किमी,2)कावपिंप्री ते पारोळा 17 कोटी
20 किमी,3)फापोरे अमळनेर मारवड निम 17 कोटी 24 किमी,4)बोळे मोढाळे बहादरपुर अमळनेर मारवड निम 17 कोटी 21 किमी,5)प्रजिमा 52 वर तांदळी ते पडावद दरम्यान पांझरा नदीवर मोठा पूल बांधणे 11 कोटी,आदी पाच कामांचा समावेश आहे.