खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

निवडणूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अमळनेर बाजार समितीच्या सर्व संचालकांवर कारवाईबाबतचा अहवाल सादर

अमळनेर (प्रतिनिधी ) निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अमळनेर कृ. ऊ. बा. समितीच्या सर्व संचालकांवर कारवाईबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांचा संचालनालयास सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. त्यामुळे खडबड उडाली आहे. गावरानी जगल्या सेना संघटनेच्या प्रयत्नांना आले यश आले आहे अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान १८ संचालकांपैकी २ संचालकांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या ( समितीची ) निवडणूक नियम 2017 मधील नियम 67 ब चे उल्लंघन करत निवडणूक खर्च विहित वेळेत सादर न करणे तसेच सर्व १८ संचालकांनी सचिव , राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण , महाराष्ट्र राज्य , पुणे यांच्याकडील दिनांक २१  जानेवारी २०२२ रोजीच्या आदेशातील क्रमांक ०९ अन्वयेच्या तरतुदींन्वये स्वतंत्र बँक खाते उघडत त्या खात्यामार्फतच निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक केलेले असतांना त्या तरतुदीच्या केलेल्या उल्लंघनाच्या बाबीची गांभीर्याने दखल घेत उमेदवारांचे संचालक पद तात्काळ रद्द करणेबाबत कार्यवाही होणे संदर्भातील अभिप्राय स्पष्टपणे नमूद असलेला सुनावणी अंतीचा   चौकशी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी मा. जिल्हा निवडणूक अधिकारी ( कृ.उ.बा.स. ) तथा जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था , जळगाव यांच्या स्तरावरून संचालक , पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे यांच्या कार्यालयात दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सादर करण्यात आल्या बाबतचे वृत्त हाती आले आहे . अमळनेर बाजार समितीची निवडणूक एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेली होती. तत्कालीन कालखंडात सदर निवडणुकीत उमेदवारांच्या स्तरावरून प्रचंड पैशांचा वापर करण्यात आल्या संदर्भातील बाबींबाबत चर्चा रंगत होत्या. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरमार्गाचा अवलंब करत संचालक निवडून आलेले असून त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येऊन न्याय मिळणे बाबतचा पत्रव्यवहार गावरानी जागल्या सेना या संघटनेच्या स्तरावरून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा उपनिबंध, सहकारी संस्था, जळगाव यांच्याशी करण्यात आलेला होता. सदर पाठपुराव्यास यश आलेले असून पणन संचालनालयाच्या स्तरावरून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या स्तरावरील अहवालाच्या अधीन राहत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचे पद रद्द करण्यात येईल याची आम्हाला खात्री असून संविधानिक तरतुदींचे उल्लंघन केल्याने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळास अद्दल घडवत अपात्र ठरविणे बाबतची महाराष्ट्रातील ही एकमेव घटना राहील, असे मत गावरानी जागल्या सेना अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव पाटील यांनी संपर्क साधतांना व्यक्त केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button