खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

राज फुटवेअरच्या संचालकाच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला

40 ग्रॅम सोन्याचे दागिने, 25000 रोकड  व चांदीचे दागिने लांबवले

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील जिनगर गल्ली मशीद जवळ असलेल्या राज फुटवेअरच्या संचालकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारत 40 ग्रॅम सोन्याचे दागिने, 25000 रोकड  व चांदीचे दागिने लांबवले. शनिवारी संध्याकाळी 6.30 ते 9.30 दरम्यान ती चोरीची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राज फुटवेअरचे संचालक जुजर फजलेहुसेन बोहरी यांचे जिनगर गल्ली मशीद जवळ घर आहे. चोरट्यांनी शनिवारी संध्याकाळी 6.30 ते 9.30 दरम्यान घर फोडून चोरी केली. यात 40 ग्रॅम सोन्याचे दागिने 25000 रोकड आणि चांदीचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह निलेश मोरे,शिरसाठ देशमाने, विनोद संदानशिव, मिलिंद सोनार, कोठावदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक देवरे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत सूचना केल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button