ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय Google Tools Workshop(Awareness of google research tools) हे पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाली 10:30 ते 1:00 दरम्यान संपन्न झाले.या प्रसंगी *मा.प्रल्हाद जाधव*(सिनिअर व्यवस्थापक,खेतान ऐण्ड को कपंनी,मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशालेच्या अध्यक्ष स्थानी डॉ डी एन वाघ हे होते. प्राचार्या डॉ ज्योती राणे यांच्या शुभ हस्ते प्रस्तुत कार्यशालेचे उदघाटन झाले.या प्रसंगी डॉ मोमाया,डॉ भराटे,डॉ शैलजा माहेश्वरी,प्रा जे सी अग्रवाल,प्रा मुकंद संदानशिव,डॉ हर्षवर्धन जाधव,प्रा दिपक पाटील (ग्रंथपाल)डॉ एम एन सूर्यवंशी,डॉ विजय बी मांटे,प्रा नितिन एस पाटील,प्रा जितेन्द्र पाटील,डॉ सुभान जाधव हे उपस्थित होते.
या प्रसंगी मा.जाधव यांनी गूगल द्वारे कोणती व कशा प्रकारे माहीती प्राप्त करता येते या संबंधी विस्तृतपणे सांगितले.संशोधन हे गुणवत्ता पूर्ण का होत नाही ? या मागिल एक कारण म्हणजे माहितीची उपलब्दता होय.त्यांनी विद्यार्थ्यांना ‘गुगल’ चे लाभ व त्याची उपयुक्तता संबंधी व्हीडीओ द्वारे मार्गदर्शन केले.प्रश्न-उत्तरे द्वारे चर्चा केली.गूगल वर माहिती कशी शोधावी,प्रोजेक्ट चा बैकप कसा ठेवावा,गूगल ड्राईव्ह चा वापर कसा करावा ? ही सर्व माहिती दिली.दुपारच्या सत्रात शिक्षक-शिक्षकेत्तर वर्गास 3 ते 5 दरम्यान मार्गदर्शन केले.
या कार्यशालेचे सूत्र संचालन डॉ विजय तुन्टे यांनी केले तर श्री विजय सजन पाटील यांनी आभार मानले.