खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला निवडणुकीचा अनुभव

अमळनेर (प्रतिनिधी)  विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी  तालुक्यातील पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेत सातवीचा वर्गमंत्री आणि मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे घेण्यात आली. यातून मुलांनी प्रत्यक्ष निवडणुकीचा आनंद घेतला.

भारतात लोकशाही आहे, वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार आपला प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून देतात.मात्र ही निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते याची उत्सुकता विद्यार्थ्यांना असते. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. यासाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी बनवण्यात आले. त्यात मुख्यनिवडणुक अधिकारी केंद्राध्यक्ष, पोलिंग अधिकारी एक ते तीन बनवून त्यांना रीतसर निवडणूक घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. काही विद्यार्थ्यांना उमेदवारांचे प्रतिनिधी करण्यात आले. तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना, जे मतदार होते, त्यांना मतदान कसे घेतले जाते, याची महिती दिली, वर्ग मंत्रीसाठी एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.  प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर मतमोजणी करून निवडून आलेल्या उमेदवाराना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रे देण्यात आले. सदर प्रक्रिया इयत्ता सातवी ब च्या वर्गशिक्षिका सुनंदा पारधी यांच्या सहकार्याने तर जेष्ठ शिक्षक प्रदिप रामदास लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. वर्गमंत्री निवडून आलेले हर्षल कैलास पाटील आणि उप वर्गमंत्री  धनश्री पुनमचंद मोतीराळे यांचे मुख्याध्यापक प्रदिप शिंगाणे   व्हि.सी. पाटील आणि शिक्षक वृदांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्रदिप लोहारे यांनी केले. सुत्रसंचालन अमित पवार यांनी केले.

 

निवडणूक प्रक्रियेत पदे भूषवणारे मुले

 

मुख्यनिवडणुकाधिकारी निशा भोई, केंद्राध्यक्ष दिशा सूर्यवंशी, मतदान केंद्राधिकारी रोहिणी भोई, प्रियंका भोई, पुनम सोनवणे, गायत्री पाटील, तेजस्विनी बिरारी, तनुजा पाटील, प्रियंका पाटील, भाग्यश्री सोनवणे, पत्रकार म्हणून विद्यार्थी तृप्ती बैसाणे  , अश्विनी पाटील तर महिला पोलीस अधिकारी म्हणुन  दिव्या रणदिवे, पुरुष पोलीस अधिकारी म्हणून जिगर सूर्यवंशी, हर्षल पाटील,सचिन पारधी, रोहित रणदिवे हे विद्यार्थी सहभागी होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button