अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील वाडी चौकातील रहिवासी व अमळनेरचे वनरक्षक संतोष शिवाजी बोरसे वय ५२ यांचे खाजगी रुग्णालयात उपचार घेताना २ रोजी मृत्यू झाला.
त्यांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यू ने झाल्याची शक्यता डॉ संदीप जोशी यांनी व्यक्त केली आहे.
संतोष बोरसे हे न्यूमोनिया झाल्याने नर्मदा फौंडेशन मध्ये दाखल झाले होते त्यांच्या आजाराची लक्षणे स्वाईन फ्ल्यू ची दिसत होती उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला त्यांची अंत्ययात्रा ३ रोजी सकाळी साडे नऊ वाजता वाडी चौक येथून निघणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुली , मुलगा असा परिवार आहे.