खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात प्रथमच कुणबी पाटील समाजाचा 8 सप्टेंबर रोजी होणार समाज मेळावा

अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थी गुणगौरव व जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासाठी शहरात प्रथमच कुणबी पाटील समाज मेळाव्याचे आयोजन दि. 8 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. गलवाडे रोडवरील ठगुबाई रिसॉर्ट व मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे.

कुणबी पाटील समाज मंडळ अमळनेर यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री अनिल पाटील, प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, उद्योजक सरजू गोकलाणी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मालेगाव येथील सुभाष पाटील, पीएसआय जे. बी. पाटील, धुळे येथील माधुरी पाटील, पालघर येथील डॉ. योगेश अहिरे, प्रमुख पाहुणे म्हणून अर्बन बँक मॅनेजर अमृत पाटील, ॲड. एस. आर. पाटील, निलेश पाटील, उद्योजक अशोक पाटील, जळगाव धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे किशोर पाटील, डॉ. रमेश अहिरराव, डॉ. विनोद पाटील, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील, रामानंद पाटील, रवींद्र पितांबर पाटील व रविंद्र गोरख पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. या वेळी 2023-24 या शैक्षणिक वर्षात 10 वी आणि 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या समाजातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व समाजबांधवांनी या मेळाव्यात उपस्थिती द्यावी, असे आवाहन कुणबी पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष शेखर लोटन पाटील, उपाध्यक्ष नवल किसन पाटील, सचिव अशोक मुरलीधर पाटील, खजिनदार पुरुषोत्तम एकनाथ पाटील, सहसेक्रेटरी शिवाजी बापू पाटील व समस्त कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button