खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यातील जिओच्या तीन टॉवरवरून १२ बॅटरी चोरी

अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यानी तालुक्यातील विविध गावातील जिओच्या तीन टॉवरवरून १२ बॅटरी चोरून नेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिओ कंपनीचे टेक्निशियन प्रशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जैतपिर येथील २८ हजार रुपये किमतीच्या ४ बॅटरी, गलवाडे शिवारातील ३५ हजाराच्या ५ बॅटरी, कळंबु शिवारातील २१ हजार किमतीच्या ३ बॅटरी अश्या अश्या एकूण ८४ हजार किमतीच्या १२ बॅटरी चोरट्याने चोरून नेली आहेत. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button