खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप महाविद्यालयामध्ये आज डॉ.भी.ना.पाटील यांचे संशोधन पद्धतीवर व्याख्यान

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयामध्ये दि 4 सप्टेंबर रोजी इतिहास संशोधक डॉ.भी.ना.पाटील यांचे संशोधन पद्धतीवर व्याख्यान होणार आहे.

प्रताप महाविद्यालय आणि रुसा संस्थेच्या वतीने पूज्य साने गुरुजी सभागृहात दुपारी 12 वाजता व्याख्यान होणार आहे. समाजशास्त्रातील संशोधन पद्धती या विषयावर प्रमुख वक्ते डॉ.भि.ना.पाटील मार्गदर्शन करतील.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण जैन  असतील. संस्थेचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव उपस्थित राहतील. सर्व पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी, संशोधक, मार्गदर्शक व प्राध्यापक, समाजातील अभ्यासक बंधू- भगिनीनी यांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतिहास विभाग व संशोधन केंद्र तसेच सामाजिकशास्त्राच्या विविध विषयाचे विभाग प्रमुख आणि महाविद्यालयीन प्रशासन यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button