खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सरपंचसह ग्राप सदस्यांनी तीन गावाच्या ८० शेतकऱ्यांना दिला पोळ्याचा साज

अमळनेर(प्रतिनिधी) ढेकूसीम, अंबासन, चारम या तिन्ही गावच्या सरपंच सुरेखा प्रवीण पाटील यांनी  व ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वांना एकच प्रकारचा बैलांचा साज देऊन ‛सुरेख’ पद्धतीने एकीचा व समानतेचा बैलपोळा साजरा केला.

सरपंच सुरेखा प्रवीण पाटील या शिक्षिका असून त्यांनी यावर्षी तिन्ही गावातील पोळा सण एकीच्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी होकार देऊन बैलांसाठी लागणारा साज, पितळी घंट्यांची घाटी, केसरी  दोर, रंग, नारळ असे साहित्य सरपंच व सदस्यांनी स्वखर्चाने सर्व शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिन्ही गावातील बैलांची शिंगे, दोर सजावट एकाच प्रकारची दिसत होती. यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये एकीची भावना रुजली. त्याच प्रमाणे या तिन्ही गावाच्या शिवारात आजूबाजूच्या गावाच्या ज्या शेतकऱयांची शेती आहे त्यांना देखील बैलांचा साज मोफत देण्यात आला. साधारणतः एक जोडीचा साज १६०० रुपये याप्रमाणे सरासरी ८० बैलजोडीचे साहित्य एकूण १ लाख २८ हजार रुपयांचे साहित्य मोफत दिले. दोन तीन दिवस आधीच सर्व शेतकऱ्यांना बैलांचा साज वाटप करण्यात येऊन एकीचा व समानतेचा संदेश देण्यात आला. पोळ्याच्या दिवशी तिन्ही गावाच्या बैलजोड्या एकत्र गावात एका ठिकाणी आणल्या. सरपंच सुरेखा पाटील यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करून नंतर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यासाठी उपसरपंच जाधवराव पाटील, बेबाबाई पाटील, मंगल पाटील, सीमा पाटील, सुरेखा भिल, मनीषा सोनवणे, भूषण पाटील, नामदेव पाटील, समाधान गायकवाड या सदस्यांचेही सहकार्य लाभले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button