खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी डीजेला बंदी नाही मात्र ध्वनी प्रदूषणाला मर्यादा : अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर

शिस्तीत आणि वेळेत मिरवणूक काढणाऱ्यांचा सन्मान करणार : चेतन राजपूत पत्रकार संघटना अध्यक्ष 

 

अमळनेर (प्रतिनिधी) गणेशोत्सवासाठी डीजेला बंदी नाही मात्र ध्वनी प्रदूषणाला मर्यादा आहेत. त्यांची काळजी मंडळानी घ्यावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले. तसेच शिस्तीत आणि वेळेत मिरवणूक काढणाऱ्यांचा सन्मान केला जाईल, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी सांगितले. अमळनेर व मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत वाणी मंगल कार्यालयात गणेशोत्सव आणि ईद निमित्त शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व त्रासदायक लोकांना हद्दपार केले जाईल. राजकीय लोकांना मंदिर अथवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येईल. मात्र राजकीय भाषणे करता येणार नाहीत, याची काळजी मंडळांनी देखील घेतली पाहिजे. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर , महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, मारवड पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक  जीभाऊ पाटील उपस्थित होते.यावेळी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून पाच वर्षांसाठी परवानगी देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी  यावेळी दिली. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी रस्ते दुरुस्ती आणि पथदिवे सुरू करण्यात येईल असे सांगितले. तर महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे यांनी आकडे टाकू नका, मंडळाना स्वस्त दरात तात्पुरते मीटर दिले जातील, गणेशोत्सवात कर्मचारी तैनात असतील, असे आश्वासन दिले. यावेळी विक्रांत पाटील, ॲड. शकील काझी, तिलोत्तमा पाटील, सुलोचना वाघ, डॉ अनिल शिंदे, माधुरी पाटील, चंद्रकांत कंखरे, लालचंद सैनानी, मनोज पाटील, डिगंबर महाले, नरेंद्र ठाकूर, बापू चौधरी, उमेश धनराळे, योगेंद्र बाविस्कर, सुरज परदेशी यांनी रस्ते, वीज, अस्वच्छता, कायदा व सुव्यवस्था बाबत समस्या मांडल्या. बैठकीस सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, महिला मंडळ ,पोलीस पाटील व पत्रकार हजर होते. बैठक यशस्वी करण्यासाठी सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, मिलिंद बोरसे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, प्रशांत पाटील आदींनी सहकार्य केले. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी तर सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

 

पत्रकार संघटना करणार सत्कार

 

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, पोलीस स्टेशन, मुंदडा बिल्डर्स, नगरपालिका, महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी देखील शिस्तीत आणि वेळेत मिरवणूक काढणाऱ्यांचा सन्मान केला जाईल, असे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button