खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

फरशी फुसण्यासाठी बोलवलेल्या महिलेचा विनयभंग करून निवृत्त मुख्याध्यापकचा घसरला पाय !

अमळनेर (प्रतिनिधी) घराची फरशी पुसण्याच्या बाहण्याने घरी बोलवून तालुक्यातील  एका माध्यमिक शाळेतील निवृत्त मुख्याध्यापकाचा चक्क पाय घसरला. दोन दिवस महिला गप्प बसली. पण अखेर हिम्मत करून तक्रार दिल्याने या निवृत्त मुख्याध्यापकाचे संस्कार मूल्य उघड झाले. ही घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घडली.

लक्ष्मी नगरात राहणाऱ्या या कुबेर निवृत्त मुख्याध्याकचे नाव आहे संजय बोरसे (पूर्ण नाव माहीत नाही). पत्नी शिक्षिका, मुलगी डॉक्टर आणि जावई आयएएस अशी सुबत्ता आणि सरस्वतीचा वास असताना ही याने एका मागासवर्गीय महिलेला फोन करून घरची फरशी पुसण्यासाठी बोलावले. गोरा गोमटा, डोक्याला टक्कल आणि दाढीमुळे स्वतःला अजूनही हँडसम समजत असल्याने महिला घरात काम करीत असताना त्याची दृष्टी फिरली. नाव संजय पण दृष्टी ध्रुत राष्टाची होऊन दुर्योधनासारखे कृत्य केल्याने त्याचा पाय घसरला. त्याने महिलेचा विनयभंग केला. संस्कार मूल्य अशी अचानक उधळले गेल्याने महिला घाबरून गेल्याने त्यादिवशी तक्रार केली नाही. नंतर हिम्मत करून महिलेने तक्रार केल्यावरून संजय बोरसे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button