अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन विद्यालयात आपत्ती व्यवस्थापना संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्ती कशा पद्धतीने हाताळावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती म्हणजे काय? आपत्ती आल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन बंब कशा पद्धतीने कार्य करते ही माहिती झंझणे यांनी दिली . तसेच विद्यार्थ्यांना आग लागल्यावर कशा पद्धतीने ती विझवावी यासंबंधी प्रात्यक्षिक करून दाखवले. शिक्षक डी. ए. धनगर यांनी शाळेत असलेले अग्निशमन सिलेंडरमध्ये नेमके काय असते? व ते कसे कार्य करते यासंबंधी शास्त्रोक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. शाळेचे लिपिक दीपक सोनवणे यावेळी उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी दिलेली सर्व माहिती अत्यंत कुतूहल पूर्वक ऐकली व शाळेत आगी संदर्भात आलेली आपत्ती कशा पद्धतीने हाताळावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शाळेत दरवर्षी अग्निशमन सिलेंडर भरून त्यासंबंधी प्रमाणपत्र घेण्यात येते व दरवर्षी ती अद्यावत करण्यात येते.