खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शहरातील विविध प्रभागात विकास कामांचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरणाचा शुभारंभ

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरणाचा शुभारंभ मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येत आहे.

अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध योजनेंतर्गत मंत्री अनिल पाटील यांनी ही कामे मंजूर केली आहे.सलग दोन दिवस मंत्री पाटील यांनी विविध प्रभागात जाऊन या कामांचा शुभारंभ केला. प्रत्येक ठिकाणी त्यांचे वाजतगाजत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.विशेष करून अमळनेर शहरात केलेला शाश्वत विकास आणि नुकतीच मंजूर झालेली 197 कोटी ची 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना याबद्दल सत्कार करण्यात आला.

सकल जैन समाजासाठी 50 लक्ष निधीतून सामाजिक सभागृह, अमळनेर शहरातील सकल जैन समाजातील सर्व पंथासाठी भांडारकर कंपाऊंड येथे 50 लक्ष निधीतुन सामाजिक सभागृह मंत्री अनिल पाटील यांनी मंजूर केले असून या कामाचे भूमिपूजन देखील समस्त जैन व मारवाडी समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले. तांबेपुरा भागात गायत्री नगर ते वैभव नगर भागात रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 80 लाख, वैभव नगर भागात रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 25 लाख, प्रभाग क्रं.1केशव नगर भागात काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, गणेश काॅलनी मध्ये गट क्रं.3741 खुला भुखंड विकसित रक्कम 30 लाख, शिव काॅलनी भागातील रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, सप्तश्रृंगी काॅलनी भागात रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 30 लाख, शिव काॅलनी भागात गट क्रं.1457/1458/1447 विकसित रक्कम 40 लाख, प्रभाग 15 गट क्रं.1438/1439 योगा हाॅल बांधकाम रक्कम 30 लाख, विदयानगर व राधाकृष्ण नगर काँक्रीटरोड रक्कम 65 लाख, प्रभाग क्रं.मधुकर शुक्ल ते उत्कर्ष नगर भागात काँक्रीटी रोड रक्कम 65 लाख, गुंजाळ आप्पा ते एस.ओ.पाटील काँक्रीटी रोड रक्कम 20 लाख, प्रभाग क्रं.7 मध्ये लक्ष्मी नगर भागात काँक्रीटी रोड रक्कम 100 लाख, न्यु प्लाॅट भागात रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण रक्कम 75 लाख, गट क्रं. 3223 मारवाडी समाज सभागृह बांधकाम रक्कम 50 लाख, गुलमोहर काॅलनी 234 खुला भुखंड विकसित रक्कम 40 लाख, प्रभाग क्रं. 14 पाटीलगडी रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, प्रभाग क्रं. 14h गुरुकृपा काॅलनी भागात रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, भालेराव नगर 1390 खुला भुखंड विकसित रक्कम 30 लाख,विदयानगर व राधाकृष्ण नगर भागात काँक्रीटरोड रक्कम 65 लाख, प्रभाग क्रं.मधुकर शुक्ल ते उत्कर्ष नगर भागात काँक्रीटी रोड रक्कम 65 लाख, गुंजाळ आप्पा ते एस.ओ.पाटील काँक्रीटी रोड रक्कम 20 लाख, प्रभाग क्रं.7 मध्ये लक्ष्मी नगर भागात काँक्रीटी रोड रक्कम 100 लाख, न्यु प्लाॅट भागात रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण रक्कम 75 लाख, गट क्रं. 3223 मारवाडी समाज सभागृह बांधकाम रक्कम 50 लाख, गुलमोहर काॅलनी 234 खुला भुखंड विकसित रक्कम 40 लाख, प्रभाग क्रं. 14 पाटीलगडी रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, प्रभाग क्रं. 14 गुरुकृपा काॅलनी भागात रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 50 लाख, भालेराव नगर 1390 खुला भुखंड विकसित रक्कम 30 लाख अशी कामे आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button