ठाकरे कुटुंबाला मदतीची गरज……
अमळनेर – जेव्हा संपूर्ण कुटुंबच अपंग असते आणि त्यात कर्ता पुरुष आजाराने ग्रस्त झाला तर त्याच्या कुटुंबापुढे संकटांचा डोंगर उभा ठाकतो आणि पैशांविना उपचार अपूर्ण ठरू लागतात तेव्हा हतबल कुटुंब पाहून मन हेलावून उठते
ही घटना आहे शहरातील औषध विक्रेता अनिल शालीग्राम ठाकरे यांची ते शहरातील दुर्गा हॉस्पीटल जवळ त्यांचे मेडिकल आहे व ते मूळ शिंदखेडा तालुक्यातील होळ येथील रहिवासी आहेत ठाकरे हे स्वतः अपंग आहेत. अपंग असतांना ते मेडिकल दुकान चालवत होते.
त्यांच्या मानेच्या मणक्यातील मज्जारज्जु दाबला गेलाने त्यांना उपचारासाठी स्पर्श हॉस्पीटल पुणे येथे दिनांक २८/१२/२०१८ रोजी अॅडमीट करण्यात आले असून अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सद्यास्थितीत प्रकृती चिंताजनक आहे. जवळपास ३ ते ४ लाख रुपये खर्च झालेला आहे.
बिकट वाट असलेलं कुटुंब – अतिशय कष्टमय जीवन जगणारे हे कुटुंब आहे. या कुटुंबाला अनुवंशी आजाराने ग्रासले असून अनिल ठाकरे हे स्वत: दोनही पायाने अस्थिव्यंग आहेत, त्यांची मुलगी, आई, लहान भाऊभावाची पत्नी, बहिण, बहिणीचा मुलगा हे सर्वच जण दोनही पायाने अस्थिव्यंग आहे. कुटुंबातील असे एकूण ७ सदस्य अपंग आहेत. यांची सर्व जबाबदारी आता अनिल ठाकरे यांच्या वडीलांवर आली आहे. या अनुवंशीक आजारामुळे त्यांना सर्वांना नेहमी वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात जावे लागत असते. त्याचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर आहेअतिशय प्रेमळ स्वभावाचे हे कुटुंब आहे.
मदतीसाठी प्रस्ताव फोल आजार नमूद नाही –
त्यांनी वैद्यकीय मदत मिळणेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लागणारे सर्व आवश्यक त कागदपत्र जमवाजमव करुन त्यांनी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला होता परंतू सदर या नवीन आजाराच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देता येत नाही म्हणून प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. सिध्दीविनायक ट्रस्ट, रतनटाटा ट्रस्ट, महालक्ष्मी ट्रस्ट मुंबईकडे देखील प्रस्ताव सादर करुन पदरी काही पडले नाही. अशातच अनिल ठाकरे यांच्या कुटुंबाचा चांगल्या बागणूकीचा विचार करुन
अमळनेर येथील त्यांच्या मित्र परिवाराने व अमळनेर शहरातील सर्व फार्मासिस्ट असोशिएशन ने विचारविनिमय करुन स्वतःच्या खिश्यातून निधी गोळा करुन जवळपास एक लाख अकरा हजार रुपयाची भरीव मोठी आर्थिक मदत करुन या कुटुंबाला मोठा दिलासा देण्याचे एक चांगले सामाजीक काम केले आहे. शासनाने या कुटुंबाची अडचण लक्षात घेऊन मदत करणे आवश्यक होते असा सुर आता उमटू लागला आहे.याकडे स्थानिक नेते, मंत्री, आमदारइतर पदाधिकारी यांनी पुढे येऊन या कुटुंबाचा विचार करुन आवश्यक ती मदत करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांच्या मित्र परिवाने केला आहे.