खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला वाहणाने धडक दिल्याने जागीच मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी)  वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी पहाटे धरणगाव अमळनेर रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक ३१ रोजी पहाटे १.३० ते ३.३० दरम्यान मयत भटु दगा चव्हाण (रा. कर्ले ता. शिंदखेडा) हा रस्त्यावरील बॉबी हॉटेलसमोर दुचाकी लावून रस्ता ओलांडून हॉटेलकडे जात असताना धरणगावकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देवून अंगावरून वाहन चालवून ७० फूट घसरत नेले. त्यामुळे सदर इसमाचा जागीच मृत्यू होवून मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला. या वाहनधारकाने न थांबता घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी तालुक्यातील कुऱ्हे येथील पोलिस पाटील राकेश नाना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button