खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बसमध्ये सापडले पैसे आणि बँकेचे पासबुक विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे केले परत

अमळनेर (प्रतिनिधी) बसमध्ये सापडलेले पैसे आणि बँकेचे पासबुक पोलिसांसमक्ष संबंधित मालकास परत करण्यात आल्याने विद्यार्थांचे  पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी कौतुक केले. अमळगाव (ता. अमळनेर) येथील गोटू जगन्नाथ चौधरी (विसपुते ) यांचा नातू  गुरुहर्ष विनिता चौधरी (सोनार) वय ११ वर्षे हा शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर येथे इ. ५ वी शिक्षण घेत असून तो दररोज  अमळनेर ते अमळगाव जा ये करतो २९ ऑगस्ट रोजी  गुरुवारी दुपारी १ वा. अमळनेरखवशी बस (नं एम एच २० – बी. एल. १२०३) मध्ये त्याला खाली पडलेली प्लस्टिक पिशवी दिसली. त्यात बँक ऑफ बरोडा अमळनेरचे पास बुक व रोख रक्कम आढळली. त्याने ते पास बु. खोपरपट (ता.अमळनेर) येथील रहिवासी लालसिंग हिलाल पाटील यांचे आहे. त्यांना बँक मार्फत बोलावून पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विकास देवरे व ठाणे अंमलदार व  मिलिंद बोरसे यांचे समक्ष लालसिंग पाटील यांना दिले. यावेळी आपले पैसे लालसिंग पाटील यांनी व पोलीस निरीक्षक गुरुहर्षचे कौतुक केले व बक्षीस दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button