खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्वामी विवेकानंद शाळेमध्ये पोळा सण उत्साहात साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद शाळेमध्ये पोळा सण साजरा करण्यात आला.  यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या जीवनातील पोळा सणाचे महत्व सांगितले.

शाळेत बैलांची जोडी आणून त्यांची पूजा करण्यात आली. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. शाळेचे प्राचार्य विनोद अमृतकर यांनी बैलांची पूजा केली. तसेच मुलांना बैलपोळा सण का साजरा केला जातो हे सांगितले. तसेच शाळेतील शिक्षकांनी बैलपोळ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. हा सण खेडेगावात कशाप्रकारे साजरा करण्यात येतो हे सांगितले. यात प्राथमिक विभागातील मुलांचा सहभाग होता.बैलांची जोडी पाहून विद्यार्थी फार आनंदित झाले. काही विद्यार्थी शेतकरी बनून आले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button