खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

निम येथील ६० वर्षीय व्यक्ती घरातून निघून झाला बेपत्ता

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथील व्यक्ती बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निम येथील नंदकिशोर पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचे वडील कालिदास सदाशिव पाटील (वय ६०) हे दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरून निघाले. मात्र गावात व नातेवाईकांकडे शोध घेतला तरीही त्यांचा तपास लागला नाही. त्यामुळे मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button