खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन

अमळनेर (प्रतिनिधी)  छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या राज्य संघटक ॲड. ललिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट  किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. ही घटना मनाला संताप आणणारी व क्लेशदायक असून, आठ महिन्यात हा पुतळा पडतो,हे निषेधार्थच आहे. या पुतळ्याची उभारणी करताना मोठा भ्रष्टाचार राज्य सरकार मार्फत झाल्याचे नाकारता येत नाही. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी शिवसेनेने हे आंदोलन केले. या पुतळ्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री व राज्य गृहमंत्री यांच्या हस्ते झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी घटनेची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा तसेच केंद्र व राज्य सरकार बरखास्त करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या वेळी तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार, शहर संघटक मोहन भोई, तालुका संघटक नितिन निळे, बाळासाहेब पवार, ज्ञानेश्वर पाटील, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनिषा परब, महिला शहरप्रमुख उज्ज्वला कदम, नाना ठाकुर, रविंद्र पाटील, विलास पवार, विजय पाटील, विधानसभा निरीक्षक कारभारी आहेर, शाखाप्रमुख संजय पाटील, मिनाताई मराठे, आशिष शर्मा, जितेंद्र साळुंखे, बाळा महाजन, विशाल पाटील, भटू पाटील, नितिन पाटील, ईश्वर नागे, गोरख बाविस्कर, समाधान पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button