खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

महिलांच्या लैंगिक छळ व रॅगिंग विरोधी कायद्याबाबत जनजागृती

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग अँड सेक्युलर हरेसमेंट समिती व अमळनेर तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य सानेगुरुजी सभागृहात महिलांच्या लैंगिक छळ व रॅगिंग विरोधी कायदा बाबत जनजागरण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ॲड. राजेंद्र व्ही. निकम ( सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी पोक्सो ऍक्ट अर्थात, बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम या विषयी माहिती दिली. ॲड. यज्ञेश्वर पी.पाटील (सदस्य, वकील संघ,अमळनेर) यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ कायद्याविषयी माहिती विशद केली. ॲड. जगदीश यु.बडगुजर (सदस्य, वकील संघ अमळनेर) यांनी रॅगिंग विरोधी कायदा व वाहतुकीचे नियम बद्दल सुक्ष्मत्वाने माहिती दिली.  या समारंभ प्रसंगी मंचावर ॲड. अविनाश व्ही.खैरनार, ॲड. किशोर डी.पाटील, खानदेश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरीताई पाटील, सुनिल पाटील (वरिष्ठ सहाय्यक, तालुका विधी सेवा समिती, अमळनेर) त्याचप्रमाणे संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव व तथा प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन यांनी भूषविले . समितीच्या सदस्या डॉ.वंदना भामरे, डॉ. प्रियंका पाटील, एस व्ही. महाले, विद्यार्थिनी प्रतिनिधी अंकिता सावंत, प्रा. पुष्पा पाटील, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा.वृषाली महाजन, प्रा.हेमलता सूर्यवंशी, प्रा.मनीषा मोरे, प्रा.सुचित्रा रत्नपारखी यांच्या सह  सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन समितीचे समन्वयक प्रा.डॉ.कल्पना पाटील यांनी केले. आभार समितीच्या सदस्य तथा गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button