खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

साने गुरुजी विद्या मंदिरात राबवला महावाचन उत्सव उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी विद्या मंदिरात महावाचन उत्सव साजरा करण्यात आला यात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची पुस्तके वाचून त्याचे समीक्षण शाळेत सादर केले.

सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत 20 ते 30 ऑगस्ट दरम्यान महावाचन उत्सव 2024 राबविण्यात आला. वाचन व लेखन उपक्रमावर भर देण्यात आला होता. शहरातील साने गुरुजी विद्या मंदिरात देखील महावाचन उत्सव साजरा करण्यात आला. यात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची पुस्तके वाचून त्याचे समीक्षण शाळेत सादर केले. तसेच 35 वर्गातील उत्कृष्ठ समीक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ करून ते शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला. उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button